Posts

आई

 आई ही एक व्यक्ती नाही तर एक भावना आहे.  अपरंपार प्रेमाची भावना... माया  काळजी  विश्वास  जिद्द  धैर्य  शौर्य  हे तिचे वेगवेगळे पदर... ह्या पदरात मोठी ताकद आहे.  लेकरांना सांभाळायची, त्यांच्या चूका झेलायची, क्षमा करायची, धडपडलेल्यांचे डोळे पुसायची  त्यांना पुन्हा उभ करायची ताकद आहे.  अपार मेहनतीची किनार आणि सहनशीलतेची झालर  असलेल्या ह्या पदराचं टोक धरून जर माणूस चालत राहिला तर दुनिया काबीज करू शकतो... इतकी प्रचंड ताकद आहे ह्यात.  हा पदर ज्यांच्या खांद्यावर दिसेल... ती आई.  ती बाईचं हवी, असं काही नाही. जन्मदातीचं हवी, असंही काही नाही  सृजनशीलतेचा हा पदर कोणच्याही खांद्यावर असू शकतो.  त्याला लिंगाचं बंधन नाही.  देहाची मर्यादा नाही. तो अर्धनारीनटेश्वराचा शेला असू शकतो, किंवा वराह अवतारात प्रकटणार्‍याचा पंचा असू शकतो. अगदी कोणाच्याही रुपात कोणत्याही वयात कोणाच्याही देहावर हा पदर असू शकतो.  आपल्या आयुष्यात असे बरेच पदर आपल्या आजूबाजूला आपल्याला सावरण्यासाठी फडकत असतात. जीर्ण जरी असला तरी तो पदर त्याच्या सावलीत आपल्याला सुखरूप ठेवतो. उबदार ठेवतो.  फक्त आपल्याला तो कधी दिसत नाही.  मात्र त्याचा

प्रवास ( A journey)

  बाहेर अचानक lockdownचे निर्बंध थोडे कडक केले होते, थोडीफार आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.अश्यात तूला एका ठिकाणी पोहचायच होतं. म्हणजे शक्य तितक्या लवकर तिथे हजर राहायचं होतं.  कुठे ते विचारल्यावर बोललास, at my place, my home town. का, कशासाठी ह्या प्रश्नाचं तुझ्याकडून एकच उत्तर."An emergency." वाहतुकीचे सगळे पर्याय फेल गेल्यावर शेवटी बाय रोड स्वतःच्या गाडीने जाणं, हा एकमेव मार्ग राहिला होता.तुझी अवस्था मला पाहवत नव्हती. मग काय, काढली माझी गाडी. बाय रोड २४ तास लागणार होते, म्हणजे अख्खा दिवस,अख्खी रात्र.  पर्याय नव्हता.निघायची जुजबी तयारी करत पहाटे ४च्या सुमारास आपण निघालो.  गणपती बाप्पा मोरया!                                                      प्रवास मोठा होता, तूला ठरल्या वेळेत ठरल्या ठिकाणी सहीसलामत पोहचवणे, हा एवढा एकच विचार माझ्या डोक्यात होता. मिनिटामिनिटाला येणार्‍या फोन आणि मेसेजने तुझा चेहरा काळवंडला होता. एक बेचैनी दाटली होती तुझ्या डोळ्यात.  तू फोनवर काय बोलतोयस, कोणाशी बोलतोयस ह्यातलं फारसं काही मला कळत नव्हतं कारण आपली भाषा, वेगवेगळी.          आपल्यात

गद्दार प्रेमी ❣

Image
संध्याकाळी scooty वरून घरी परतताना मनात हुरहुर लागतेच मला, तू रस्त्यात गाठणार ह्याची.  50 च्या speed ला कानात जेंव्हा रफी गुणगुणत असतो तेंव्हा त्या हलक्या हवेच्या स्पर्शात तू जाणवतोस. तोच ओलावा. जरा स्वतः मध्ये तो झिरपू द्यावा म्हणे पर्यंत तू थेट भेटतोसच.  आणि  'अरे जरा थांब!,' म्हणे पर्यंत तू पार आवेगात येतोस.  माझ्या सतराशेसाठ विनवण्या तू क्षणात धुडकावून टाकतोस. तुझं हल्ली हे नेहमीचं झालंय.  तूला काय बाबा,  रोज मला घरी आईला कारणं द्यावी लागतात.  बहाणे बनवावे लागतात.  रेनकोट न नेण्याचे. आणि मग आईचा ओरडा खावा लागतो, "आलीस परत भिजून. पाऊस काय फक्त तूला भिजवण्यापुरता येतो का? थांबला आता." आईची स्तुतिसुमने ऐकून घ्यायच्या आधीच तू निघून जातोस.  चक्क गायब होतोस. ओलेत्या खुणा मागे ठेऊन  "प्रेमात अशी गद्दारी चालत नाही रे, पावसा!". ❣❣❣ - नमिता

Dear kajal..

Image
 Dear kajal Your were been in my life since childhood. But I have never valued you. May be i thought you are old fashion.  So I stopped applying you. I was completely wrong.  And after so many years, i don't remember when but I felt myself helpless & I applied you.  An miracle happens!!! You taught me how a swollen eyes can look beautiful with deep dark past. You made me confident.  You set border of my tears and don't allowed them to fallen. You made me strong. You handled every strom peacefully. You taught me to be calm. You always forced me to stuck on truth cause eyes can't lie. You made me loyal.  Every possible way, You helped me to get real me. And changed my concept towards beauty.  You are not just cosmetic, you are my strength. I feel incomplete without you.  I  🖤 U.  Dr Namita 

साद

साद  तुझा माझ्यातला पहिला दुवा... तुझा आवाज काहिसा खोल  काहीसा गोड थोडा चिडका  थोडा रडका.. त्यात तुझ ते मध्येच कंटाळवाण ह्म्म्म्म... म्हणणं  शून्यात नजर लावून मोठा उसासा घेतं अच्छा म्हणणं... तुला माहितेय, हसताना तुझा आवाज दाबला जायचा, एकदा सहज बोलून गेलास... जखमा अजून ओल्या आहेत ग... मी फुंकर घालू पाहिली,  तर नको म्हणालास.  लोक काय म्हणतील म्हणून  तिथेच थांबलास.... जरा हात दिला असतास  तर भेट झाली असती... ह्या तीरावरून त्या तीरावरची साद ऐकू आली असती आता फार पाणी वाहून गेलय  साकव असूनही येता येणार नाही  तरीही मध्येच तुझी एखादी शीळ  अजूनही बेचैन करते.. आणि ऐकू येते, तू न घातलेली... तुझी साद.  नमिता 

रिश्ता

 वैसे तो आजतक हम कभी मिले नही.. ना मैने कभी कोशिश कियी  ना तुमसे कभी उम्मीद रखी... फिरभी, एक रिश्ता तो है हमारा... जिसका कोई नाम नही, कोई वजूद नही... जिसमे कोई मिलन नही, कोई संगम नही  पर फिर भी वह बह रहा है  कभी हवा बनकर.. कभी पानी बनकर  न जाने कबसे.....  न जाने कबतक.. पता नही फिर लोग ये कयू कहते है, के उन्होने हमे एकसाथ देखा है .. भला धरती और अंबर का कभी मिलन हुवा है कया?   तुम जानते हों, मै तुझमे समा सकती हूं, पर तुम आपनाते नही .. और मै जानती हूं, तुम कभी आपनाओगे नही... फिरभी एक रिश्ता तो है हमारा.... दिखाते नही हों पर जातते खूब हों .. खामोश रेहकर सताते बहोत हों  जो चाहू बिछडना तुमसे साया बनकर सिलहाते बहोत हों ... नाराजगी जानते हों मेरी  पर कभी मनाते नही  कभी धूप कभी छाव  कभी बादल कभी बारीश चाँद तारे बर्फ तूफान  सब कुछ डालते हों आंचल मे मेरे  पर खुद कभी आते नही ... ना ही आओगे कभी.... शायद जहा कयामात मिलती है  वहा मिलोगे मुझे... तब तक ये रिश्ता तो रहेगा हमारा.... - नमिता 

dear Teddybear

लहानपणी म्हणजे अगदी तीन चार वर्षांची असताना माझ्याकडे एक मोठा teddy होता. म्हणजे बरीच खेळणी होती, त्यातली काही तुटली मोडली काही हरवली पण हा कायम सोबत राहिला.  लहानपणी खेळताना कोणी सोबत असल नसल ह्याचा काही फरक नाही पडायचा कारण तो असायचा . तीन चाकी सायकल चालवताना, किचन सेट मांडून घर-घर खेळताना, तो असायचा सोबत.  त्याला खोटा खोटा चहा बनवून देण्यापासून ते त्याचाच फूटबॉल बनवून तो खेळेपर्यंत अगदी कोणताही खेळ खेळायची मी. आपडी तापडी गुळाची पापडी .. अशी माझी बडबड ऐकायला तो कायम बाजूला असायचा. अ ब क ड पासून ते रंगांची उजळणी पर्यन्त, तो बाजूला हवाच.  पुढे दुसरी तिसरीत असताना पाढे पाठ करताना उजळणी त्याच्यासमोर. इतिहासातील तारखा मराठीच्या कविता त्याच्यासमोर बोलल्या जायच्या. कधी पेपर खराब गेला, तर सगळ्यात आधी त्याला सांगायचे मग आई पप्पांना.  emmotionaly ही त्याच्याशी अटॅच होतेच. पप्पा ओरडले की रडकं तोंड घेऊन त्याच्या कुशीत जाऊन  झोपायचे, कुणा मैत्रिणीशी भांडण झाला की "मी आता तिच्याशी कधीच बोलणार नाही." ह्या शपथाही त्याच्या साक्षीने घ्यायचे. खेळातले चीटिंग confession त्याच्या कानात..शाळेतली